चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी का उठवली? ही शिवशाही कि दारूशाही?
गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारू बंदी आहे, गावा गावानमध्ये महिला संघटना आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याच्या बहुतेक भागातील गावात दारू बंदी चांगल्या रीतीने चालू आहे. पण शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. दारू बंदी असलेल्या जिल्ह्यात शासनाने दारू सुरु करू नये. तर दारू बंदी मजबूत केली पाहिजे. असे आम्हाला वाटतंय.
चंद्रपूर मध्ये दारू विक्री सुरु झाली तर गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध दारू येऊन त्याचा उलट परिणाम होईल, जिल्ह्याच्या सीमांवर दुकानें सुरु होतील. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभावी दारू बंदीला धक्का बसेल. हा महिलांवर मोठा अन्याय होईल,चंद्रपूरच्या दारू विक्रेत्यांची घरे भरतील पण आमचे संसार नस्ट होतील.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी कायम रहावी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी अधिक कडक करण्यात यावी. जेणेकरून स्त्रियांचे संसार या अवैध दारू मूळे उजडणार नाही. तर चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतीही अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात येणार नाही याची जबाबदारी शासनाने घ्यावी असीही मागणी आपल्या पाठवलेल्या निरोपतून महिलांनी केली आहे.
आपण सर्वांना जर वाटतं असेल आपल्या आईच-बहिणीचं-पत्नीचं,आणि मुलीच जीवन नस्ट व्हायला नाही पाहिजे तर आपली प्रतिक्रिया आम्हाला व्यक्त करा आणि जास्तीत जास्त याला Share करा जेणेकरून अनेक स्त्रियांचे घर नस्ट होणार नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.