Ratnagiri: रत्नागिरी देवधे राज्य महामार्ग क्रमांक १६५ ला चांदेराई गावात काजळी नदीकिनारी रस्त्याच्या बाजूची दरड कोसळल्याने अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
माजी सरपंच दादा दळी यांनी २ वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता यांना आणून या ठिकाणी संरक्षक भिंत व गुरव हॉटेल समोरची मोरी हि दोन्ही कामे होणे गरजेचे आहे असे सांगितले होते.
तसेच शाखा अभियंता यांनी हा रस्ता दुरुस्तीच्या कामात ही दोन्ही कामे घेतो असे सांगितले होते. परंतु अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने काहीही केले नसल्याने काल मुसळधार पावसात रस्त्याच्या बाजूची मोठी दरड कोसळल्याने या ठिकाणी अपघात होऊ शकतो.
अथवा रात्रीच्या वेळेस चालणारा पादचारी पण कोसळू शकतो, तरी सार्वजनिक खात्याने येथे तात्काळ उपाय योजना करावी व संभाव्य धोका टाळावा अशी मागणी दादा दळी यांनी केली आहे.