'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur News उमरेड: आ. पारवेंनी पाळला शब्द पालकत्व स्विकारलेल्या मुलीच लावून दिले लग्न

0

उमरेड,Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Latest Marathi News,लग्न समारंभ,लग्न,Covid-19,

Nagpur News उमरेड:
आज दिनांक २७/०६/२०२१ रोज रविवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड – १९ मध्ये दगावलेल्या बऱ्याच कुटुंबियांना भेट देत मातृत्व किवा पितृत्व हरवलेल्या मुला मुलीचे पालकतत्व स्वीकारले आहे. 

अशाच आज एक पालकतत्व मोहिमेतील स्वीकारलेल्या मुलीचे लग्न लावून आमदार मोहद्यांनी शब्द पाडत कन्यादान केले.

पल्लवी मेश्राम बुधवारी पेठ सरकारी हॉस्पिटल, उमरेड येथे आजी जवळ राहत होती. लहान असतांनी आई, वडिलांचे छत्र हरवले अशातच तिच्या आजीने पल्लवीला आपल्या जवळ उमरेडला ठेवले तिच शिक्षण पालन पोषण तिच्या आजीच करत होती,  घरात फक्त आजी आणि तिच राहायची दुसरा कोणताही आधार नव्हता अशातच कोविड महामारीत आजी स्व. शुभद्रा सलामे ईचे निधन झाले व  पल्लवीच्या डोक्यावर असलेल्या  आजीचे सर्वस्व हरवले होते. आजी जिवंत असतांनी लग्न जुडले होते आता करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. 

उमरेड,Nagpur,Nagpur LIve,nagpur news,Latest Marathi News,लग्न समारंभ,लग्न,Covid-19,

उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ पारवे यांनी उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविडणे दगावलेल्या कुटुबियांना भेट देत आर्थिक मदत करत ज्या कुटुंबातील छत्र हरवले अश्यना सांत्वना दिली. अशातच आमदार राजूभाऊ पारवे मोहद्यांनी स्व. सुभद्रा सलामे यांचा घरी भेट दायला गेले होते तेव्हा त्यांना पल्लवी ईची माहिती मिळाली तेव्हा आमदार साहेबांनी पल्लवीचे पालकतत्व स्वीकारले व शब्द दिला मी या मुलीच्या लग्नाचा खर्च उचला आणि आज तो दिवस उजळला आमदार महोद्याचा सुचणे नुसार त्या मुलीला लग्न समारंभ करिता कॉंग्रेस कार्यकर्त यांनी पुढाकार घेऊन लग्न समारंभ पार पाडला आमदार महोदयांनी स्वत: येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत, मुलीला मंडपात नेणे, एक मामा म्हणून आशीर्वाद देणे पूर्ण कार्यक्रम घेत पर्यंत व्यवस्थे कडे लक्ष दिले व लग्न समारंभ थाटामाटात पार पाडला.

त्यावेळी पल्लवीच्या चेहऱ्यावर चे हास्य आले होते ते पाहण्या जोगे होते. कारण तिला आमदार राजूभाऊ पारवे यांच्यावर विश्वास होता कि ते तिच्या पाठीशी खंबीर उभे आहेत व पल्लवीने डोळे नम करत आमदार महोदयाचे आभार मानले.

या वेळी गंगाधर रेवतकर, सुरेश चीचमलकर, राजेश भेंडे, महेश भूयारकर, विशाल देशमुख, जितेंद्र गिरडकर, मधुकर लांजेवार, सुरज इटनकर, योगिता इटनकर, सुषमा पारवे, बाळू इंगोले, प्रमोद भेदे, गुणवंत मांढरे, गजानन भेंडे, घनश्याम लव्हे, मंगेश गिरडकर, मुकेश आंबोणे, रितेश राऊत, राकेश नौकरकर, श्वेता मोहोड, अमित लाडेकर, आनंद पुनवटकर या वेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×