Maharashtra Lockdown New Guideline: राज्यात कोरोना निर्बंधांमध्ये मोठे बदल; राज्य सरकारचे नवे आदेश

Maharashtra Lockdown,महाराष्ट्र,Lockdown News,डेल्टा प्लस,लॉकडाऊन,Maharashtra,Mumbai,
Maharashtra Lockdown,महाराष्ट्र,Lockdown News,डेल्टा प्लस,लॉकडाऊन,Maharashtra,Mumbai,
Maharashtra Lockdown New Guideline

Maharashtra Lockdown: राज्यात एकदा पुन्हा कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि २५ जूनला राज्यात डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू झालं आहे. त्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले आहेत.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण जर कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्वच जिल्हे आणि महानगरपालिका पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.

सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोनावरील निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत देखील फक्त RT-PCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देश दिले आहेत.

आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील.

Maharashtra Lockdown New Guideline: कसे असतील नवे नियम 

● सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात येत असल्या सुरवातीला तिसऱ्या टप्प्याची नियमावली व्यवस्थित समजून घेऊ - या टप्प्यासाठी असलेल्या नियमावलीनुसार 

● आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील - तर इतर दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार याच दिवशी सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील. 

● अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील -  तर दुपारी दोन वाजल्यानंतर जमावबंदी लागू असेल 

● हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील - तसेच सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाला सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने परवानगी असेल 

● सार्वजनिक उद्याने,मैदान सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील - तसेच लग्नासाठी ५० माणसांची - तर अंत्यविधीसाठी २० माणसांची परवानगी असेल -  हे सर्व तिसऱ्या टप्यासाठी असलेले नियम आहेत - 

● आता यामध्ये आणखी काही नियम नव्याने येऊ शकतात का - ते पाहावे लागेल - तसे याविषयी आणखी काही अपडेट आले -  तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.