Maharashtra: डेल्टा प्लस व्हेरियंटने मुळे राज्यात पहिला मृत्यू...

डेल्टा प्लस,रत्नागिरी,Ratnagiri,Ratnagiri Live,Ratnagiri News,Maharashtra,Mumbai,Mumbai News,Ratnagiri Corona News,

डेल्टा प्लस,रत्नागिरी,Ratnagiri,Ratnagiri Live,Ratnagiri News,Maharashtra,Mumbai,Mumbai News,Ratnagiri Corona News,
Maharashtra: डेल्टा प्लस मुळे राज्यात पहिला मृत्यू 

Maharashtra
: राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण आहेत की नाहीत याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असताना आज डेल्टा प्लस व्हेरिएन्टने संक्रमित असेलल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, हि बाब राज्यासाठी चांगली असली तरीही आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित 21 रुग्ण आहेत. यापैकी या नव्या व्हेरियंटने संक्रमित 80 वर्षीय महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. 

मृत्यू झालेल्या महिलेला इतरही अनेक सहव्याधी होत्या, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे येत आहे. 

संगमेश्वरमधील 80 वर्षाच्या महिलेचा या  डेल्टा प्लस व्हेरियंटने मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णलयात या डेल्टा प्लस विषाणूने संक्रमित झालेल्या महिलेवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून याला आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.