रस्त्याच्या बांधकामासाठी चिखलात लोटांगण घेऊन आंदोलन

Amravati,Amravati News,अमरावती,Marathi News,

Amravati,Amravati News,अमरावती,Marathi News,

Amaravti: 
अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नागरवाडी ते वनी बेलखेडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील वनी बेलखेडा ते नागरवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता पावसामुळे अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याहून चालणे सुद्धा बिकट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चक्क लोटांगण घेऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष याकडे वेधले आहे.

जर जिल्हा प्रशासनाने यावर लक्ष जर नाही दिले तर रस्त्यावरील चिखल जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये टाकण्यात येईल असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.