![]() |
Maharashtra Lockdown: राज्याला डेल्टा प्लस विषाणूचा धोका.... |
Maharashtra Lockdown: डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येणार आहेत. या बाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊ शकतो, कारण डेल्टा प्लस विषाणूचा धोका लक्षात घेऊन या बाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो.
काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली पुन्हा वाढ व बाजारपेठांमध्ये अतिजास्त गर्दीमुळे कोरोनाची साखळी पुन्हा वाढत आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी बैठकीत झाल्याचं समजते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांच्या वेळेत पुन्हा कमी करण्यात येऊ शकतात.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून राज्याला पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. डेल्टा प्लस व्हेरियंट लवकरच तिसऱ्या लाटेला सुद्धा आमंत्रण देऊ शकतो, म्हणून हा धोका लक्षात घेणून राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे.
राज्यातील लॉकडाऊन वरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 20 दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. पण निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. त्यातच म्हणजे डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळल्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.