कोरपना: दोन दुचाकीची समोरासमोर जबरदस्त धडक; तीन ठार , एक गंभीर जखमी

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,road accident,Chandrapur News IN Marathi,Accident News Live,कोरपना,

कोरपना
: आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दोन बाईक समोरा समोर धडकल्याने तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. सदर घटना २३ जून बुधवार रोजी दुपारी अंदाजे ३ च्या सुमारास पारडी येथील शिव मंदिरा जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सुपर स्प्लेंडर बाईक क्र. एमएच ३४ एन ५१३५ ही कोरपनाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या यामाहा बाईकला धडकली यात स्प्लेंडर वरील सोयाम (३७), विश्वास(४०) रा यलपुर व यामाहा बाईकवरील राजू (३४) रा. इदरवेल्ली हे जागीच ठार झाले तर मुस्तकीम (१८) रा. इदरखेल्ली हा गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मृतदेहांना ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->