तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur News: चिमुर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार,चिमुर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार,Tiger Attack,वाघाच्या हल्ल्यात मृत्यू,चिमुर,Chandrapur,

चिमुर,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Tiger Attack,

Chandrapur News:
चिमुर तालुक्यातील हरणी गावातील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्याची खबळजनक घटना काल २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव शामराव डोमाजी नन्नावरे रा. हरणी ता. चिमुर जि.चंद्रपूर असे आहे. 

नेहमीप्रमाणे मृतक शामराव नन्नावरे आपल्या शेतात काम करीत असतांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नन्नावरे यांच्यावर हल्ला केला यात ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहचून सविस्तर पंचनामा केला व मृत शरीर शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रूग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले. 

ऐण पावसाळी शेतीचा हंगाम सुरू होत असतांनाच कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर फारचं मोठं दुखांचा डोंगर कोसळला आहे.

पावसाळी शेतीचा हंगाम सुरू झाला असतांना प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जात असतात व त्यातच अशा प्रकारच्या घटना घडल्याने गावकऱ्यात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. अशा घटनांमुळे मानव-वन्यजिव संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.