'
30 seconds remaining
Skip Ad >

Bramhapuri News: ब्रह्मपुरी वैनगंगा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

0

Bramhapuri,ब्रम्हपुरी,Bramhapuri Live,Bramhapuri Marathi News,Bramhapuri News,wadsa,रणमोचन,Gadchiroli,
ब्रह्मपुरी वैनगंगा नदीपात्रात आढळला महिलेचा प्रेत

Bramhapuri News: ब्रम्हपुरी तालुक्यातील रणमोचन (खरकाळा) वैनगंगा नदीच्या काठावर एका महिलेचे मृत्यू असेलेले प्रेत दि.18 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता च्या सुमारास आढळून आल्याने रणमोचन (खरकाळा) परिसरात मोठी खळबळ उडाली होती. 

त्यानंतर सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन तात्काळ देण्यात आली होती व ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी त्या ठिकाणी जाऊन सदर महिलेचे प्रेत ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

मृतक महिलेची नाव शालू गिरीधर चंदनखेडे वय (३५) अशा प्रकारे सदर महिलेची ओळख पटली गेली आहे. व महिला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नाहीतर देसाईगंज (वडसा) ला लागून असलेल्या विरशी हे गाव तिचे माहेरघर असल्याची माहिती समोर आली आहे. 

शालू चंदनखेडे या महिलेने ब्रह्मपुरी-वडसा महामार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते, पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×