देसाईगंज (वडसा) – दिनांक:18 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कडून वडसा तालुक्यात उद्या शनिवार 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना कोविद लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. आरोग्य अधिकारी माहितीनुसार शहरी भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी मध्ये 50-50 टक्के सूट देण्यात आली आहे.
तर तालुक्यातील ग्रामीण भागात 0 संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्या नंतर 30 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.
उद्या तालुक्यातील 4 लसीकरण केंद्रावर या वरील वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध होणार असून तर सोमवार पासून तालुक्यातील सर्वच केंद्रांवर 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लास घ्यावे असे आव्हान वडसा तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.