Crime News: मास्क घातला नाही म्हणून बँकेतील सुरक्षा रक्षकाने ग्राहकाला गोळी घातली

Be
0

Crime News: मास्क घातला नाही म्हणून बँकेतील सुरक्षा रक्षकाने ग्राहकाला गोळी घातली
Crime News: मास्क घातला नाही म्हणून ग्राहकाला गोळी घातली

Crime News : मास्क न घालता बँकेत आलेल्या एका ग्राहकाला सुरक्षा रक्षकाने गोळी झाडल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली येथील बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयात घडली आहे. यात संबंधित ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

तर, सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. राजेश कुमार राठोड (वय,35) जखमीचे नवा आहे तर केशव कुमार असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

Crime News: नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या

राजेश सिव्हिल लाइन्स येथील बँक ऑफ बडोदाच्या प्रादेशिक कार्यालयात विनामास्क गेले होते. त्यावेळी केशव कुमार याने राजेशला मास्कविना प्रवेशास विरोध दर्शवला. 

यामुळे दोघांमध्ये वाद झाला याचदरम्यान, केशवने आपल्या जवळ असलेल्या बंदूकीने राजेशवर गोळी झाडली. ज्यात राजेश गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->