Corona Vaccine: देशात लवकरच गर्भवती महिलांना सुद्धा दिली जाणार कोरोना लस?

Covid-19,Coronavirus Live,coronavirus,Vaccine,India’s Fight Against COVID-19,Corona Vaccine,

Covid-19,Coronavirus Live,coronavirus,Vaccine,India’s Fight Against COVID-19,Corona Vaccine,

Corona Vaccine: 
देशात कोरोना लसीकरण सुरु झाले असून नुकतेच १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत  लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. यामध्ये आता आयसीएमआरने हे संभ्रम दूर केले आहेत.

देशात कोरोना लसीकरण नुकतेच सुरु झाले असून १८ वर्षावरील येत असणाऱ्या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरणास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. यामध्ये आता ( ICMR ) आयसीएमआरने हे संभ्रम आज दूर केले आहेत.

ICMR डीजी बलराम भार्गव म्हणाले कि, 'आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन नुसार गर्भवती महिलांना सुद्धा आता लस दिली जाईल. गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपयुक्त असून त्यांनी ते करावे'. त्यामुळे आता गर्भवती महिलांना देखील लस दिली जाणार आहे.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटने पुन्हा धोका वाढला आहे. दरम्यान, तज्ञांनी कोरोनाची विषाणूची तिसरी लाट भारतात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे देशात सध्या चिंतेचे वातावरण सगळीकडे निर्माण होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस घेणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.