वरोरा - वरोरा येथील यात्रा वार्ड येथील रहिवाशी अंकुश जगदीश खोब्रागडे , वय 50 वर्ष , आई - द्रौपताबाई जगदीश खोब्रागडे वय 80 वर्ष रा. यात्रा वार्ड वरोरा यांचा जवळपास 3 दिवसापासून अन्न पाण्या विना मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.!
Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत$ads={1}
यात्रा वार्डातील रहिवासी यांचे स्वतःचे घर आहे या घराची विक्री करून मोठा मुलगा हा मुंबई येथे कामाला निघून गेला त्यामुळे मृतक मुलगा अंकुश व त्याची आई हे त्याचं घरात वास्तव्यास होते अंकुश हा पोलिओ ग्रस्त असून गेल्या 10,15 दिवसा पासून त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो घरीच राहत होता. व आई ही दुर्धर आजार ग्रस्त असल्यामुळे ती घरीच राहत होती ,त्यांच्या जेवणाची व्यवस्था बाजूला असणाऱ्या जानवे यांच्या खानावळीत त्यांच्या मुंबई येथील मुलाने करून दिली होती.
Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी$ads={2}
गेल्या 2,3 दिवसापासून ते घरा बाहेरील जेवणाचा डब्बा नेण्या करिता न आल्यामुळे लोकांचा शंका आली व घरा जवळील लोकांना वास यायला लागल्या नंतर लोकांनी जाऊन बघितले असता दोघेही माय लेक मृत अवस्थेत दिसून आले, शिवसेनेचे संकेत जानवे यांना काही काम असल्याने त्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली पोलीस नगर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मृतकांच्या घरात पाहिले असता घरात वासाच वास सुटला होता, पोलिसांनी म र्ग दाखल केला , ए पी आई निलेश चवरे ,त्यांच्या सहकारी यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.