Breaking News: सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एस.के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र सरकारच्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच हे प्रकरण मोठे आहे आणि आरोप गंभीर आहेत, त्यामुळे सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
$ads={1}
Read Also: नागपूर कोरोना मधील मृत्यू आणि रुग्ण यांचा नवीन रेकॉर्ड
सुप्रीम कोर्टाने तोंडी निरीक्षण दिले असून अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. 'सार्वजनिक डोमेनमधील आरोप अत्यंत गंभीर आहेत. आरोपांचा मोठा परिणाम झाला आहे. सीबीआय चौकशीसाठी हे योग्य प्रकरण नाही काय? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी हायकोर्टाचा आदेश अयोग्य आहे असे म्हणता येणार नाही,' असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.