'
30 seconds remaining
Skip Ad >

Sindewahi Live: वाघाच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोन इसम ठार... | Batmi Express Marathi

0

chandrapur news,चंद्रपूर च्या बातम्या,चंद्रपूर जिल्ह्याच्या बातम्या,चंद्रपूर लाईव्ह न्युज,चंद्रपूर जिल्हा बातम्या,chandrapur batmya
वाघाच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोन इसम ठार...( Represented Img)

Sindewahi Live:
सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या पवनपार येथे वाघाने एका मागुन एक इसमावर हल्ला करून एकाच परीवारातील दोन व्यक्तीं च्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची खळबळजनक घटना सकाळी 7:00 वाजताच्या सुमारास घडली आहे.

$ads={1}

मृतक इसमाचे नाव. कमलाकर रूषी उंदीरवाडे  , दूरवास धानू  उंदीरवाडे असे वाघाने ठार केलेल्या इसमाचे नाव आहे. सदर घटना पवनपार ते खैरी या मार्गावर परंतू पवनपार गावाजवळ घडली आहे.

सद्या मोहफुल गोळा करण्याचे काम पवनपार परीसरात जोमाने सुरू आहेत . गावात काम नाही त्यामुळे मोहफुल गोळा करून कित्येक कुटूंब आपली उपजिविका चालवितात .आज सकाळीच पवनपार येथिल नागरीक मोहफुल गोळा करायला गेले होते.जिथे घटना घडली हे ठिकान गावापासुन अगदी जवळ घडली.

सदर व्यक्ती गावालगतच मोहफुल गोळा करीत होते. दबा धरून बसलेल्या वाघाने दोघावरही एकामागुन एक हल्ला केला.  ते जागीच गतप्राण झाले. दोन्ही शवांना उत्तरीय तपासनी करीता पाठवण्यात आले.

$ads={2}

घटना पाहण्याकरिता पवनपार, गुंजेवाही, पवना, खैरी, टेकरी, सामदा  या गावातील लोक आले असल्याने घटनास्थळी जत्रेचे रूप आले होते.

सदर घटनेने पवनपार व परीसरात गावात  भितीची दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Read Also:   सिंदेवाही शिवणी वनपरिक्षेत्रात, वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

Read Also:  बाघ के हमले में मृतक के परिवार के अभिभावक मंत्री के प्रति संवेदना

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×