'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Live: रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीचा सुधारित प्रस्ताव तात्काळ सादर करावा- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

0

Chandrapur College Close ,Live,Chandrapur Live News,Chandrapur News,News

Chandrapur Live:
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त व सौंदर्यीकरण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागांने फुट ओव्हर ब्रिज बांधकाम प्रस्तावाची रक्कम कमी करुन नवीन प्रस्ताव सादर करावा. तसेच तलावातील गाळ काढणे व एस.टी.पी. (Seivage Treatment Plant) बसविण्याचे काम, मच्छीनाला येथील पाणी झरपट नदी येथे वळविण्याकरीता नाला बांधकाम व पश्चिम बाजुला रिटेलिंग वॉलचे बांधकाम इ. कामांचे सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी घेऊन पाटबंधारे विभाग व महानगरपालिका यांनी तात्काळ कामे सुरु करावे, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

$ads={1}

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करणे व सौंदर्यीकरण करणे याबाबत नुकतेच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा स्टेशन मास्टर रेल्वे विभाग श्री. मुर्ती, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ संरक्षण सहायक पुरातत्व विभाग प्रशांत शिंदे, इको-प्रो संस्थेचे बंडु धोतरे, विक्रांत जोशी इ. उपस्थित होते.
$ads={2}
तलावातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असून ज्या शेतकऱ्यांना हा गाळ हवा असेल त्यांना तो देण्यात यावा असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यापुर्वी सर्व अधिकारीसमवेत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी रामाळा तलावाची पाहणी केली.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×