(Chandrapur Corona Total Cases) : सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 56 हजार 203 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
Chandrapur Corona Death Today: : 09। आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील 36 वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील 40 वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील 80 वर्षीय महिला, नागभीड येथील 67 वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील 52 वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 50 वर्षे महिला, वरोरा शहरातील 60 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 456 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 413, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
Chandrapur Corona Cases Today: आज बाधीत आलेल्या 668 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 175, चंद्रपूर तालुका 50, बल्लारपूर 36, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 21, नागभिड 31, सिंदेवाही नऊ, मूल 37, सावली 23, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी दोन, राजूरा 25, चिमूर 39, वरोरा 133, कोरपना 37, जीवती दोन व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.
$ads={2}
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.