Yavatmal Live: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव यांच्या 4 एप्रिलच्या ब्रेक द चेन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याकरीता 30 एप्रिल 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत मार्गदर्शक सुचना लागू करण्यात आल्या आहेत. तसेच आठवड्याच्या शेवटी शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Read Also: जिल्ह्यात 627 नव्याने पॉझेटिव्ह; आठ जणांचा मृत्यु - 643 जण कोरोनामुक्त
$ads={1}
मात्र राज्यात रक्तसाठ्याची कमतरता असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत राजकीय, सामाजिक, धार्मिक, अशासकीय संस्था, गृहनिर्माण संस्था यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करावयाचे असल्यास त्यांना शनिवार व रविवार या संचारबंदीच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी आदेशान्वये कळविले आहे. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.