Yavatmal Corona Outbreak: जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुकास्तरीय यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आर्णि, महागाव व उमरखेड मध्ये जाऊन आढावा घेतला. आर्णि तालुक्यातील भंडारी येथील कोव्हीड केअर सेंटरला त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच भरती असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी$ads={1}
रुग्णांच्या काही अडअडचणी असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. तालुक्याचा पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी टेस्टिंग वाढविणे आवश्यक आहे. तालुक्याला दिलेल्या टेस्टिंगच्या उद्दिष्टाप्रमाणे येत्या आठ दिवसांत पॉझिटीव्हीटी दर 5 पर्यंत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. लसीकरणाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण नियोजनबध्द पध्दतीने करा. कोणतीही लस वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच प्रतिबंधित क्षेत्र धोरण कडकपणे राबवा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये शासन आणि प्रशासनाच्या सुचनांबाबत (नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझरचा उपयोग) जनजागृती करा तसेच नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक दंडात्मक कारवाई करा, अशा सुचना त्यांनी दिल्या. Read Also: नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण लवकर निदान तसेच टेस्टिंग झाले आणि वेळेवर उपचार मिळाला तर नक्कीच रुग्णसंख्येला आळा बसेल. परिणामी मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. त्या दृष्टीने नियोजन करा. प्रशासनाच्यावतीने ‘आम्ही यवतमाळकर……मात करू कोरोनावर’ ही मोहीम यशस्वीपणे राबवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार परसराम भोसले, तालुका आरोग्य अधिकारी श्यामसुंदर शिंदे, गटविकास अधिकारी आनंद लोहकरे, ठाणेदार पितांबर जाधव आदी उपस्थित होते.
$ads={2}
उमरखेड येथे भेट व आढावा : उमरखेड येथील तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सर्व पॉझिटीव्ह रुग्णांना कोव्हीड केअर सेंटरला दाखल करा. पॉझिटीव्हीटी दर पाच टक्यांपेक्षा कमी करणे व मृत्युदर 0.5 टक्के आणणे याला प्राधान्य द्या. यावेळी त्यांनी मरसूळ येथील कोव्हीड केअर सेंटर व उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.