Bhandara Corona Updates: जिल्ह्यात आज 563 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17294 झाली असून आज 984 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26805 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.51 टक्के आहे. Read Also: महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता? मंत्री विजय वडेट्टीवारांचे जनतेला संकेत
$ads={1}
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 389, मोहाडी 105, तुमसर 159, पवनी 137, लाखनी 46, साकोली 77 व लाखांदुर तालुक्यातील 71 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 17294 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 26805 झाली असून 9106 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 405 झाली आहे. Read Also: शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी शेखर सिंह
शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.