नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावरील कृषी नगर, सुलेझरी परिसरात आज एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक काही काळासाठी घाबरून गेले.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही वाहनांतील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेग आणि बेफिकीर वाहनचालना यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.