Suicide: १७ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ | Batmi Express

Be
0

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Suicide,Sakoli,Bhandara News,Bhandara Live,

भंडारा :
शिवजयंतीच्या उत्सवी वातावरणात तुमसर तालुक्यातील सीतासावंगी (न्यू कॉलनी) येथे एक हृदयद्रावक घटना घडली. गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली.

मृत तरुणीचे नाव मानवता संजय चौरे (रा. सीतासावंगी, ता. तुमसर, जि. भंडारा) असे असून ती तुमसर येथील यूएसए विद्यानिकेतन विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेण्याच्या घटनांत वाढ होत असल्याची चिंताजनक बाब या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

घटनेच्या वेळी तिचे आई-वडील घरातील हॉलमध्ये बसले होते. घरात सर्व सदस्य उपस्थित असतानाच मानवता आपल्या खोलीत गेली व तिने आतून दरवाजा बंद केला. बराच वेळ उलटूनही ती बाहेर आली नाही किंवा आवाजाला प्रतिसाद दिला नाही. संशय आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

तत्काळ गोबरवाही पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->