![]() |
गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले |
भंडारा : गत काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाचे जोरदार आगमन होत आहे. विदर्भातील भंडारा, गडचिरोलीसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
शनिवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. मात्र, दुपारनंतर पाण्याचा वाढता दबाव लक्षात घेता आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले होते. पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होताना दिसून येताच पुनः चार दरवाजे खुले करण्यात आले होते. सध्या एकूण 19 दरवाज्यांतून अंदाजे 2,335 क्युमेक्स ( 82 हजार 471 क्युसेक) वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
Click On AI : CLICK ME
या विसर्गामुळे भंडारा ते चंद्रपूरला जोडणाऱ्या मार्गावरील सावरला पुलावर पाण्याची पातळी वाढल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच भंडारा-कारधा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना वाहनचालक व नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.