भंडारा :- पालांदूर-मानेगाव राज्य मार्गावरील गोंडेगाव शिवारात सोमवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या अपघातात ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव आशिष रमेश गोंडाणे (रा. पालांदूर, ता. लाखनी, जि. भंडारा) असे आहे. तो आपल्या दुचाकीने (एमएच ३६ एएन ५४२८) पालांदूरकडे परतत असताना दुचाकीची बसच्या समोरील भागास जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण दूर जाऊन पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली.
गोंडेगावजवळ म्हशींचा कळप रस्त्यावर आल्याने विहीरगावहून लाखनीकडे जाणारी एसटी बस (एमएच ०६ एस ८८३४) चालकाने रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी वळणावर आलेल्या आशिषच्या एमएच ३६ एएन ५४२८ क्रमांकाच्या दुचाकीने लाखनी वरून स्वगावी पालांदूरकडे परत जात असतांनाच वळणावरबसच्या समोरील भागास जोरदार धडक बसली. धडकेनंतर तो काही अंतरावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
स्थानिकांनी तात्काळ त्याला लाखनी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पालांदूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.