![]() |
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले |
भंडारा/गडचिरोली, दि. 21 ऑगस्ट : गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या 2,500 क्युमेक्स विसर्ग सुरू असून तो वाढवून 4,000 क्युमेक्सपर्यंत नेण्यात येणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, गडचिरोली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, पुढील काळात विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पाण्याच्या येवामध्ये अनपेक्षित वाढ झाल्यास आणि धरण तसेच भंडारा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विसर्ग 7,000 ते 8,000 क्युमेक्सपर्यंत वाढविण्यात येऊ शकतो.
यामुळे वैनगंगा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात अनावश्यक हालचाल किंवा आवागमन टाळावे, असेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.