![]() |
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; १३ मार्ग बंद |
गडचिरोली :- जिल्ह्याच्या दक्षिण भागात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. भामरागड, अहेरी, चामोर्शी यांसारख्या तालुक्यांमध्ये दिवसभर जोरदार पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी भामरागड शहरातील वसाहती तसेच अनेक दुकाने पाण्याखाली गेली. परिणामी, स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या पुरामुळे अनेक कुटुंबांचे जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क राहून मदत कार्यात सक्रिय झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल १३ रस्ते पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. पुराचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने नागरिकांनी धोका पत्करून पुल ओलांडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 19.08.2025
वेळ सायंकाळी 5.00 वा
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड
2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
3) तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-381(पोहार नदी)तालुका चामोर्शी
4)कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग-377 (सती नदी) तालुका कुरखेडा
5) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला) तालुका चामोर्शी
6) काढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-7(स्थानिक नाला) तालुका कुरखेडा
7) शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-1 तालुका देसाईगंज
8) कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49 तालूका देसाईगंज
9) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47 तालुका देसाईगंज
10) पोरला वडधा रस्ता प्रजिमा-7 तालुका कुरखेडा
11) भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17 (हळदीमाल नाला
12) हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-24 तालुका भामरागड
13) गडचिरोली चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग-379 तालुका गडचिरोली
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.