गडचिरोली :-
सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात आज सकाळच्या 11 वाजताच्या सुमारास 04 मार्ग बंद होते. परंतु पुराच्या वाढत्या प्रभावामुळे आतापर्यत 5 मार्ग बंद झालं आहेत. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना आवागमन करू नये, अश्याही सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 25.07.2025
वेळ दुपारी 02.00 वा.
- 1) हेमलकसा भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी)राष्ट्रीय महामार्ग-130 D तालुका भामरागड
- 2) सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) तालुका सिरोंचा
- 3) ताडगाव दामरंचा रस्ता , इजिमा-26 तालुका भामरागड (दामरंचा जवळ बांडीया नदी)
- 4) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)तालुका अहेरी
- 5) हलवेर ते कोठी रस्ता इजिमा-24 तालुका भामरागड