चंद्रपूर:- जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना दिवसे-दिवस समोर येत आहे. आज पुन्हा एकदा मूल तालुक्यातील भादूर्णा गावात वाघाच्या हल्ल्यात एक महिला मृत्युमुखी पडली. महिलेचे नाव भूमिका दीपक भेंदारे (वय 28) असे आहे.
सविस्तर वृतात : अस आहे की, उन्हाळा सुरू झाल्याने तेंदूपत्ता चा हंगाम चालू आहे, त्याकरिता महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करण्याकरिता जात असतात अशातच सकाळच्या सुमारास भूमिका भेंदारे या आपल्या पतीसह व गावातील इतर महिलांसोबत जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास आणि पंचनामा सुरू आहे. मागील तीन दिवसांत तेंदूपत्ता गोळा करताना वाघाच्या हल्ल्यांमध्ये एकूण पाच महिलांचा मृत्यू झाला आहे.
हे पण नक्की वाचा: वाघाच्या हल्ल्यात तीन महिला जागीच ठार
चंद्रपुरातिल सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना 10 मे रोजी घडली होती. चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना घडलीय. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह तेंदूपत्ता तोडायला जंगलात गेल्या होत्या.
मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश, कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृतक महिलांची नावं आहेत. सर्व मृतक मेंढा-माल येथील रहिवासी, वनविभागाने मौका पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टमसाठी सिंदेवाहीला रवाना करण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात आणखी एक महिलेचा बळी:
तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यामध्ये महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 7:30 वाजता चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत नागाळा कक्ष क्रमांक 537 मध्ये घडली. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रोजगाराचे साधन म्हणून तेंदुपत्ता संकलनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जंगलात जातात. नागाळा येथील बुधाजी शेंडे रविवारी सकाळी पत्नीला घेऊन तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, दबा धरून असलेल्या वाघाने विमल शेंडे यांच्यावर हल्ला केला. जवळपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली असता, वाघाने पळ काढला. मात्र, विमलचा जागीच मृत्यू झाला.