![]() |
Image Source: SB |
Maharashtra HSC Result 2025: : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल 91.88% टक्के लागला आहे. कोकण बोर्डाचा सर्वाधिक निकाल 96.74 टक्के लागला आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी (89.46 टक्के) लागला आहे तर पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.32 टक्के इतकी आहे. यावर्षी मुंबई विभागाचा निकाल (92.93 टक्के) लागला आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने सर्वाधिक 96.74 टक्के निकालासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी सर्वोत्तम बाजी मारली असून त्यांच्या निकालाचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अधिक आहे.
नऊ विभागीय मंडळांचा निकाल :
- पुणे - 91.32
- नागपूर - 90.52
- छत्रपती संभाजीनगर - 92.94
- मुंबई - 92.93
- कोल्हापूर - 93.64
- अमरावती - 91.43
- नाशिक - 91.31
- लातूर - 89.46
- कोकण - 96.74
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 कसा तपासायचा:
- बातमी एक्सप्रेसची अधिकृत वेबसाइटवर ( https://www.batmiexpress.com/p/hsc-result-2025-live.html) जा आणि Menu / होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव लिहा (उदा. आईचं नाव Usha)
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.