सावली:- पंचायत समिती सावली ( Sawali Panchayat Samiti ) अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा ( Z. P. School In Pardi ) येथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या 132 विद्यार्थ्यांनां अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना आज दुपारी उघडी आली असून सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचार सुरू आहे.
पोषण आहारामधुन विद्यार्थ्यांना हगवण, उलटी व ताप आल्याने विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यावर उपचार करण्यात येत असुन निदानानंतर विषबाधा निघाल्यास दोषीवर कारवाई करण्यात येईल.मोरेश्वर बोंडे, गटशिक्षणाधिकारी पं.स. सावली
शालेय पोषण आहारामध्ये विषबाधा झालेला प्रकार गंभीर असून योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.