Chandrapur Drowned News: पोलीस बनायचं होतं स्वप्न मात्र नियतीने घात केला | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur  News,Chandrapur   News,Drowned,Drowned News,

चंद्रपूर:- 
चंद्रपूर तालुक्यातील धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाले. यात एका मुलीला वाचविण्यात तरुणांना यश आले मात्र एका तरुणींचा मृत्यू झाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हि घटना आज दि. 15 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली.

मृतकाचे नाव संध्या शिंदे रा. वणी ता. जिवती (वय 20 वर्षे) असे आहे तर युगल नागापुरे रा. सोनापूर देशपांडे ता. गोडपिंपरी (वय 19 वर्षे) आहे. यामध्ये समिक्षा शेंडे रा. बाबूपेठ (वय 20 वर्षे) हिला तरुणांच्या मदतीने वाचविण्यात यश आले.

सविस्तर वृत असे की आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे हे आपल्या 36 विद्यार्थ्यांना घेऊन धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीवर व्यायाम करण्यासाठी आणले होते. व्यायाम झाल्यानंतर काही मुल-मुली पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली बुडाल्या. एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. जवळ असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले. तर एका मुलीचा मृतदेह विद्यार्थ्यांनी पाण्यातून बाहेर काढला. तर एक मृतदेह मिळाला नसून शोध मोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी घुग्घुस व गडचांदूर पोलीस दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->