Ladaki Bahin Yojna Fund Transfer: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम 14 ऑगस्ट पासूनच खात्यात जमा होण्यास सुरवात | Batmi Express

Ladaki Bahin Yojna Fund Transfer,Ladaki Bahin Yojna,Ladaki Bahin Yojna News,Ladaki Bahin Yojna Updated,Ladaki Bahin Yojna 1st Installament
Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli News IN Marathi,Ladaki Bahin Yojana,Ladaki Bahin Yojana News,
Image Src= TV9


मुंबई :-राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी,आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दिनांक-14 ऑगस्टपर्यत राज्यात 111 कोटी 62 लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.मंत्री तटकरे म्हणाल्या की,दिनांक- 14 ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा दिनांक- 17 ऑगस्ट पर्यंत लाभ मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.