भंडारा :-शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे आज,सोमवारी दिनांक- १५ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली.आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले (दोन्ही रा. आंधळगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत.या घटनेत अन्य महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.
आज,सोमवारी डोंगरगाव येथील शेतशिवारात रोवणीचे काम सुरू असताना अचानक ढग दाटून आले.दरम्यान अचानक वीज कोसळल्याने आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर रुख्मा निमजे,मयना सोनकुसरे,वंदना जिभकाटे या महिला जखमी झाल्या आहेत.