वडसा: ब्रम्हपुरी शहरातील 24 वर्षीय तरुणीची वैनगंगा नदी पात्रात उडी घेत आत्महत्या | Batmi Express

Desaiganj,Bramhapuri,Bramhapuri Suicide,Bramhapuri News,Bramhapuri Today,wadsa,Wadsa News,Wadsa Suicide,

Desaiganj,Bramhapuri,Bramhapuri Suicide,Bramhapuri News,Bramhapuri Today,wadsa,Wadsa News,Wadsa Suicide,

ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी येथील एका 24 वर्षीय तरुणीने वडसा (देसाईगंज) जवळील वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. तरुणीने वैनगंगा नदीच्या पुलावरुण उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी,दिनांक- 16 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव  ईशा घनश्याम बिंजवे वय (24 वर्षे) असे आहे. आत्महत्या केलेली तरुणी ब्रम्हपुरी येथील निवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी आहे. 

सविस्तर वृत्त असे की, तरुणीने आपली दुचाकी ॲक्टिवा क्रमांक-एमएच-49,झेड- 4176 ने वडसा (देसाईगंज) येथील वैनगंगा नदीच्या पुलावर सायंकाळच्या सुमारास आली. पुलावर दुचाकी उभी केली. त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या. त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली. वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती काही वेळ बचावली. 

मात्र, ईशा आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने कमी पाण्यातून ती जास्त खोल पात्राकडे जाऊ लागली. यावेळी ईशा जास्त पाणी असलेल्या पात्रात पोहचली आणि त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त होत असल्याने ती वर आलीच नाही. या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता. काल,बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला.आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

अनेकजण व्हिडिओ,फोटो काढण्यात व्यस्त:

वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर तिने नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ,तर काहींनी फोटो काढले. मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता,असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.