युवतीची गळफास घेत आत्महत्या
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दूध डेअरी परिसरातील अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये एका युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे . युवतीने आत्महत्या केल्याची घटना आज दि. 23 जूनला रात्रौला 1 वाजताच्या सुमारास घडली. मंजिरी सावरकर असं आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. (Girl Suicide | Young Girl Suicide | Chandrapur Suicide)
चंद्रपूर शहरातील दूध डेअरी परिसरातील अष्टविनायक अपार्टमेंट मध्ये राहत असणारी मंजिरी सावरकर हिने घरचे सर्व जण झोपल्यानंतर रात्रौला 1 वाजताच्या सुमारास स्वयंपाक खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मंजिरी हि सरदार पटेल महाविद्याल चंद्रपूर येथे शिक्षण घेत होती.
Also Read:- दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू; डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. शव शवविच्छेदन करुन अंतिम संस्कार करण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. तिच्या पश्चात आई, वडिल, आजोबा, आजी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.