चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉ. अभिलाषा गावतूरे यांच्याकडे विठ्ठल मंदिर वार्डातील दहा वर्षीय श्रीपर्ण मुरकुटे याला सर्पदंश झाल्याने दिनांक रविवार दिनांक 15 जून ला सकाळी भरती करण्यात आले. परिवारातील सदस्यांनी मुलाला गळ्याचा त्रास व डोक्यात जड होत असल्याचे सांगितले व तोंडातून फेस निघत असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री मण्यार नावाचा साप घरी सापडला व तो वडील आणि मुलगा झोपून असतांना बेडवर आला व नंतर बाहेर गेला असल्याचे सांगून मुलाला सर्प दंश असल्याचे सांगितले मात्र डॉ अभिलाषा गावतुरे यांनी सर्पदंशाचा उपचार न करता गळ्यात टॉन्सिल असल्याचे सांगून मुलाला त्या दिशेने उपचार केला. त्यामुळे मुलगा दीड ते दोन तासात गंभीर झाला व तो झटके मारायला लागला परंतु तरीही डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुलाला सर्पदंश झाला असल्याचे लक्षात न येता केवळ टॉन्सिलचा उपचार केला यथायाने श्रीपर्णची प्रकृती चिंताजनक होऊन मुलगा गतप्राण झाला.
तो पेशंट माझा नियमित पेशंट आहे. घसा दुखत असल्याचे सांगून सकाळी आठ वाजता दाखल झाला. त्यामुळे कान-नाक-घसा तज्ज्ञाला पाचारण केले, कुणी साप चावला असे सांगितले नाही. परंतु, रात्री साप निघाल्याचे सांगताच संपूर्ण तपासणी करून उपचारही सुरू केला. परंतु, कान-नाक-घसा तज्ज्ञ येण्यापूर्वीच त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला डॉ. वासाडे हॉस्पिटलकडे स्वतः घेऊन गेले. उपचारात कोणतीच कसर सोडली नाही.
डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.