Murder: एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा त्याने डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात घेतला जीव | Batmi Express

Wardha,Wardha Crime,wardha jila,wardha news,Wardha Murder,Murder,

Wardha,Wardha Crime,wardha jila,wardha news,Wardha Murder,Murder,

वर्धा
:- देवळी येथे घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोनेगाव मार्गावर भरदिवसा रस्त्यावर एका व्यक्तीच्या डोक्यावर वारंवार दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं.

विनोद डोमाजी भरणे राहणार सोनेगाव (आबाजी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर करण मोहिते असं आरोपीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्येचं कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरक्षेच्या कारणातून आरोपीला वर्धा शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. तर 2 जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.