Flood Effects: गडचिरोली व चंद्रपूरच्या इतक्या गावांना पुरामुळे होऊ शकतो धोका निर्माण | Batmi Express

Be
0

 Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

गडचिरोली/चंद्रपूर:- चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून 21 जून रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 190.23 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

गोसीखुर्द धरणातून 40 घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने 29 जूनपर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा 179.800 मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक 18 जून 2024 रोजी पाणी पातळी 178.90 मी. व पाणीसाठा 11.285 द.ल.घ.मी. इतका आहे.

या गावांना पुरामुळे आहे धोका?

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ. वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. 
मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->