सविस्तर वृतात : उन्हाळा सुरू झाल्याने तेंदूपत्ता चा हंगाम चालू आहे, त्याकरिता महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करीत आहे. 4 मे रोजी सकाळी 8.30 वाजता शिवानी परिक्षेत्रातील कुकुडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बिट क्रमांक 322 येथे मौजा बामणिमाल येथील निवासी सौ. दीपा दिलीप गेडाम (33) वर्षीय ह्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने दीपा वर अचानक हल्ला करीत तिच्या नरडीचा चावा घेत तिला ठार केले, घटनास्थळ जवळ नाल्याजवळ वाघ बसून होता, त्यावेळी दीपा ही तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. आज तेंदूपत्ता गोळा करण्याचा दुसरा दिवस होता.
Read Also:
ब्रम्हपुरी: कोसारा जंगलात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
दीपा वर वाघाने हल्ला केल्याची बाब गावी कळताच नागरिक व वनविभागाने जंगलाच्या दिशेने तात्काळ धाव घेतली, घटनास्थळी दीपा यांचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता.
वनविभागाने घटनेचा तात्काळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला,
मृतक दिपाच्या पतीला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये दिले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, क्षेत्र सहायक प्रधान शिवनी, वन रक्षक मडावी, कोवे, शेख, भारत मडावी, सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पि आर टी सदस्य हजर होते.