Maharashtra SSC Result 2024: कोकण अव्वल! राज्याचा 10वीचा निकाल 95.81 टक्के; मुलींची बाजी, नागपूर 94.73%, मुंबई: 95.19 | Batmi Express

SSC 2024 Result,Education News,Maharashtra SSC 10th Result 2024,SSC 2024 Exam Result,Education,SSC 2024 Exam News,SSC 2024 Exam,SSC 2024,10वीचा 2024 न

SSC 2024 Result,Education News,Maharashtra SSC 10th Result 2024,SSC 2024 Exam Result,Education,SSC 2024 Exam News,SSC 2024 Exam,SSC 2024,10वीचा 2024 निकाल,

Maharashtra SSC Result 2024: :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होतील. राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 99.01 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94.73 टक्के लागला आहे.यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात 1.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यातील तब्बल 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2024 मध्ये घेतलेली दहावीची परीक्षा दिली. त्यातील 14  लाख 84 हजार 441 म्हणजेच 95.81 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी सर्वोत्तम बाजी मारली आहे. यावर्षी 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण  94.56 टक्के आहे. 
मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 2.65 टक्के ने अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 99.01 टक्के लागला असून नागपूर विभागाचा 94.73 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. 

विद्यार्थ्यांची आकडेवारी:

  • एकूण परीक्षेला बसले विद्यार्थी : 8,59,478
  • एकूण परीक्षेला बसले मुले: 8,44,116
  • एकूण परीक्षेला बसले मुली: 8,44,116
  • निकालाची टक्केवारी : 95.81 टक्के
  • मुलींचा निकाल: 97.21 टक्के
  • मुलांचा निकाल: 94.56 टक्के

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :विभागीय मंडळ : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
  • पुणे : 2,62,949 : 2,53,600 : 96.44 टक्के

  • नागपूर : 1,49,897 : 1,42,005 : 94.73 टक्के

  • औरंगाबाद : 1,82,844 : 1,74,056 : 95.19 टक्के

  • मुंबई : 3,39,269 : 3,25,142: 95.19 टक्के

  • कोल्हापूर : 1,27,818 : 1,24,567 : 97.45 टक्के

  • अमरावती : 1,59,684: 1,52,631: 95.58 टक्के

  • नाशिक : 1,95,582 : 1,86,352 : 95.28 टक्के

  • लातूर : 1,04,503 : 99,517 : 95.27 टक्के

  • कोकण : 26,780: 26,517 : 99.01 टक्के


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.