Big News! कूलरमधील विजेचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू | Batmi Express

Be
0

Akola,Akola Live,Akola News,Coller Shock,

अकोला:-
 अकोला शहरात कूलरमधील विजेचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. युक्ती अमोल गोगे या मृत मुलीचे नाव आहे. 5 मे रोजी रविवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत होती. ती कूलरजवळ गेली असता तिला कूलरचा विजेचा शॉक लागल्याने तिचा जागेवरच कोसळून मृत्यू झाला.

युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. कूलरमध्ये पाणी भरत असताना अथवा कुलर सुरू असताना विद्युत प्रवाह आणि बाबी तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->