चंद्रपूर :- IMD ( India Meteorological Department ) म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभाग नागपुर यांनी येत्या 3 तासात चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाट, गारपीट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्रालय, मुंबई
Read Also:
चंद्रपूरसह गडचिरोली,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस घालणार थैमान…
9 वाजून 01 मिनिटांनी मोबाईल SMS द्वारे चंद्रपूर या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहिती दिली गेली असली तरीही; काही नागरिकांना याची जाणीव नसते. सर्वप्रथम विजांचे कडकडाट सुरू असल्यास काय करायला हवं - मोबाईल फोन, इंटरनेट व ऑनलाईन सुविधा टाळावे. रस्त्यामध्ये व इतर शेत शिवारात असल्यास झाडाचा आळोसा घेऊ नये; पूर परिस्थिती वा आपत्ती जनक स्थितीत सापडल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही IMD नागपुर यांनी नागरिकांना मोबाईल SMS द्वारे कळविले आहे.