कर्मतीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी |
ब्रम्हपुरी (दि. 30/04/2024) :आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोज मंगलवारला कर्मतीर कन्नमवार विद्यालय सुरबोडी येथे तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमा प्रसंगी आधुनिक किंसान शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. मैंद साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य मा. पिलारे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम मैंद साहेब यांनी वंदनीय तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्य अर्पण करुन अभिवादन केला. त्याच प्रमाणे मा. पिलारे सर यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्य अर्पण कुरुन अभिवादन केला, तसेच सर्व उपस्थित कर्मचारी वृंद यांनी पुष्य अर्पन करुन अभिवादन केला.
मा. पिलारे सर यांनी वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजांचे कार्य हे आदर्श जिवनाचा मूलमंत्र देणार आहे. त्याचे प्रत्येकाने आपल्या जिवनात महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजे असे प्रतिपादन पिलारे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. ढोरे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मा. राने सर यांनी केले. राष्ट्र वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.