नागभीड:- भेटवस्तू घेण्यासाठी मैत्रिणीसोबत नागभीडला आलेल्या एका शाळकरी मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडलेल्या याप्रकरणाची पोलिसांनी नोंद केली नसली तरी चौकशीत पोलिस यंत्रणा गुंतली आहे.
बेपत्ता झालेली मुलगी ४ थ्या वर्गात शिकत आहे. शनिवारी शाळेचा शेवटचा दिवस असल्याने भेटवस्तू ती घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी आपल्या तीन-चार मैत्रिणींसोबत सायकलने नागभीडला आली. भेटवस्तू घेतल्यानंतर परत जात असताना तोंडाला दुपट्टा बांधून असलेला एक तरुण मोटारसायकलने आला. गावाकडे येता का, असे या मुलींना त्याने विचारले. यापैकी संबंधित मुलगी मोटारसायकलवर बसली. त्याने गाडी नवखळा मार्गाने नेल्याने मुलींना शंका आली.
या घटनेनंतर अन्य मुली तिथेच रडत बसल्या. रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तींनी चौकशी केली असता घडलेला घटनाक्रम सांगितला. नंतर या व्यक्तींनी गावात जाऊन माहिती दिली. लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन नागभीड पोलिसांनीही तातडीने हालचाल करून घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली.
मुलगी अल्पवयीन आहे. अपहरणाचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. चौकशी सुरू आहे.
विजय राठोड, ठाणेदार, नागभीड.