खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेचा समरोप ; जपतलाई संघ विजेता
गडचिरोली :: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी ठेवून सातत्याने संघर्ष करा असा मुलमंत्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिले.
गडचिरोली तालुक्यातील मौजा खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले सद्याचा काळ हा संघर्षाचा आहे. सहज आणि आयते कोणालाच मिळत नाही, क्षेत्र कोणतेही असले तरी स्पर्धेत टिकायचे असल्यास सातत्याने प्रयत्न करावेच लागेल. आयुष्यात यश अपयश मिळत असते मात्र अपयशाला खचून न जाता, परत जिद्दीने पुढील कार्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
खरपुंडी विरुद्ध जपतलाई संघात झालेल्या अंतिम सामन्यात जपतलाई संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
|ब्रम्हपुरी: रेती चोरीच्या नादात गेला युवकाचा जीव
यावेळी माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ढिवरू मेश्राम, सुधीर बांबोळे, कमलेश खोब्रागडे,आनंदराव नैताम, विकास जुवारे, प्रल्हाद जुमनाके, यशवंत नैताम, नामदेव सहारे, राज कुनघाटकर, स्वप्निल दुमाने, कमलाकर नैताम, गुरुदास सहारे, गणेश कोकोडे, मोरेश्वर मेश्राम, लक्ष्मीकांत गावडे, समीर कोल्हे, प्रफुल जेंगठे, प्रवीण मेश्राम, हितेश कुळमेथे, आकाश तटसावार, पंकज जुवारे, महेश गावडे, लोमेश गुरूनुले, आकाश मोटघरे सह मोठ्या संख्येने मान्यवर, सहभागी खेळाडू आणि गावातील क्रीडाप्रेमी युवक, महिला, पुरुष उपस्थित होते.