गडचिरोली :- कुरखेडा उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनाला तेरा हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई पाच फेब्रुवारी सोमवारला करण्यात आली.
नागसेन प्रेमदास वैद्य, वय 46 वर्षे, पद – अव्वल कारकून, उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा ता. कुरखेडा जि. गडचिरोलीअसे लाचखोर आरोपीचे नाव आहे.
आरोपीने तक्रारदार यास आदिवासी ते आदिवासी ला जमीन विक्री करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी नामे नागसेन प्रेमदास वैद्य यांनी रुपये 15,000/- लाच रक्कमेची मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तडजोडीअंती रुपये 13,000/- लाच रक्कम उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथील स्वतःचे कक्षात स्वीकारल्याने नमुद आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे . पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर, नागपूर, अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्री सचिन कदम, अ , मा.श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक अधिकारी श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलिस उपअधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली
तपासी अधिकारी :-
श्री. श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली पोहवा शंकर डांगे, राजेश पद्मगिरीवार, पो.अं. संदीप घोरमोडे, संदीप उडाण चा.पो.ना. प्रफुल डोर्लीकर सर्व ला.प्र.वि. गडचिरोली. यांच्या पथकाने केली