महिलेवर वाघाचा हल्ला... अन... धाडसी महिलांनी वाघाचा परतवून लावला | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli Today,

गडचिरोली:- साक्षात वाघाला समोर पाहिल्यानंतर भल्याभल्यांची डाळ पातळ झाल्याशिवाय राहात नाही. पण बोदली गावातल्या बहाद्दर महिलांनी चक्क वाघाचा सामना करत त्याला पळवून लावून एका महिलेची त्याच्या तावडीतून सुटका केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. मंदाबाई बंडू कोठारे असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलांनी एकजूट होऊन दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचला.

मंदाबाईसह गावातील काही महिला सरपण गोळा करण्यासाठी बोदलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामागील जंगलात गेल्या होत्या. यावेळी झुडूपात लपून बसलेल्या वाघाने मंदाबाईवर झडप घातली. पण, मंदाबाई पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडण्याआधीच जवळ असलेल्या महिलांनी सावध होऊन आरडाओरड केली. त्या महिलांचा रुद्रावतार पाहून वाघाने जंगलात धूम ठोकली. यावेळी मंदाबाई जखमी झाल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->