नागपूर : स्पा च्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या पथकाला खामला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अमजनेजा स्पाच्या आड गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीची शहानिशा केली व सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास डमी ग्राहक पाठविण्यात आला. तेथे सौदा झाला व डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे चार मुली-महिला आढळून आल्या.
Nagpur Gang Rape News: एका महिलेवर 36 दिवस सामुहिक बलात्कार
पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकासह तिघांना ताब्यात घेतले. तीनही आरोपींविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या भागात अनेक दिवसांपासून देहव्यापाराचे काम सुरू होते. गरीब घरांतील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करविल्या जात होता. मुली-महिलांना अगोदर मसाज पार्लरच्या नावाखाली कामावर ठेवल्या जात होते व त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते. पोलीस या रॅकेटच्या इतर लिंक्स शोधत आहेत. पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, सचिन बढिये, लता गवई, शेषराव राऊत, आरती चव्हाण, अश्विन मांगे, नितीन वासने यांच्या पथकाने ही कारवाई केली.