Paytm Payments Bank: पेटीएम वर अकाऊंट असेल तर सावधान, 1 मार्चपासून अनेक सेवा बंद, आरबीआयने घातली बंदी | Batmi Express

Paytm Payments Bank,पेटीएम पेमेंट्स बँक,RBI,RBI Latest News,RBI News,BanK News,

Paytm Payments Bank,पेटीएम पेमेंट्स बँक,RBI,RBI Latest News,RBI News,BanK News,

Paytm Payments Bank- ( 
पेटीएम पेमेंट्स बँक): रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (रिझर्व्ह बँक) क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने कंपनीवरील क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह सर्व प्रकारच्या सुविधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पेटीएम पेमेंट बँक देखील नवीन ग्राहक जोडू शकणार नाही.

ग्राहकांना त्यांचे पैसे काढता येणार आहेत

रिझव्र्ह बँकेने सांगितले आहे की, येथे खाते असलेले सर्व ग्राहक यामधून आपले पैसे काढू शकतात. आरबीआयने म्हटले आहे की ग्राहक त्यांचे पैसे बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून काढू शकतात. पेटीएम पेमेंट बँकेने नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे आरबीआयने हे कठोर पाऊल उचलले आहे. आरबीआयने म्हटले आहे की ऑडिटमध्ये अनेक पर्यवेक्षी उणिवा दिसून आल्या आहेत.

आरबीआय ने कोणत्या सेवांवर बंदी केली?

नवीन ग्राहक जोडण्यावर RBI ने निर्बंध लादले आहेत. याशिवाय नियम न पाळल्याबद्दल आरबीआयवर कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की 1 मार्चपासून नवीन ठेवी आणि टॉपअपवर बंदी आहे. वॉलेट, फास्टॅग, मोबिलिटी कार्ड टॉपअपवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इतर ग्राहकांसाठी पैसे काढण्यावर कोणतेही बंधन नाही. ग्राहक त्यांच्या वॉलेट, FASTags, कार्डमधील पैसे वापरू शकतील. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.